भारतीय कुटुंबाचा पाया म्हणजे “उद्यासाठी आज जपून ठेवलेला पैसा. आजच्या काळात रोजच्या खर्चात वाढ होत असली तरी थोडं थोडं वाचवत राहणं हेच खरं सुरक्षित भविष्याचं गमक आहे. बचत ही केवळ पैसा साठवण्यापुरती मर्यादित नसून ती जीवनशैलीचा एक भाग आहे. ग्रामीण भागात शेतकरी असो किंवा शहरी भागातील मध्यमवर्गीय कुटुंब – प्रत्येकालाच कधी ना कधी आकस्मिक खर्च, मुलांचे शिक्षण, विवाह किंवा वैद्यकीय गरज यासाठी आधाराची गरज भासते. अशावेळी रोजची थोडी थोडी बचत हेच मोठं भांडवल ठरते.
आपल्या आई-आज्जीच्या काळात घरातल्या हंडीत दररोज थोडे पैसे जमा करण्याची पद्धत होती. या छोट्या छोट्या बचतीतून वर्षभरात मोठं भांडवल उभं राहत असे. आजच्या काळात हीच परंपरा अधिक सुरक्षित व नियोजित पद्धतीने ठेव योजनांच्या माध्यमातून पुढे नेली जाऊ शकते. रोजच्या खर्चातून १०, २० किंवा ५० रुपये बाजूला ठेवले तरी वर्षभरात त्यातून भक्कम रक्कम तयार होते.
आजच्या काळात तुळजाभवानी अर्बन आपल्या ग्राहकांसाठी विविध ठेव योजना उपलब्ध करून देते. या योजनांमुळे रोज थोडे पैसे सुरक्षितरीत्या साठवले जाऊन त्यावर व्याज मिळते.
शेतकरी वर्गाला हवामानाचा किंवा बाजारभावाचा नेहमीच धोका असतो. पिकांच्या हंगामात जास्त पैसा मिळाला तरी तो योग्य पद्धतीने साठवला नाही तर पुढील काळात अडचण निर्माण होते. अशावेळी ठेव योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आधार. रोज किंवा महिन्याला ठराविक रक्कम ठेवून शेतीतील आकस्मिक खर्च सहज भागवता येतो.
घरगुती अर्थकारणात महिलांचा मोठा वाटा असतो. स्वयंपाक, दैनंदिन खर्च वाचवून त्या जी छोटी बचत करतात, तीच पुढे मोठ्या संकटातून कुटुंबाला वाचवते. ठेव योजनांच्या माध्यमातून या बचतीला अधिक बळ मिळतं. सुरक्षित व नियोजित बचतीमुळे महिलांच्या हातात आत्मनिर्भरतेचं सामर्थ्य येतं.
महागाईच्या वाढत्या टप्प्यात कुटुंबाचा खर्च हाताळताना बचत ही अवघड गोष्ट वाटते. पण महिन्याच्या उत्पन्नातून थोडा भाग वाचवून तो सुरक्षित ठेवणे हेच सुज्ञ निर्णय ठरते. ठेव योजनांमुळे ही बचत केवळ सुरक्षित राहतेच नाही तर वाढतेही.
बचत ही मोठ्या उत्पन्नावर अवलंबून नसते. ती आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. रोजच्या जीवनशैलीत थोडासा बदल करून, अनावश्यक खर्च कमी करून आणि नियमित बचत करण्याची सवय लावून प्रत्येकजण भविष्यासाठी सुरक्षित पायाभरणी करू शकतो.
लहान बचत ही मोठा आधार बनते, यासाठी केवळ एक पाऊल पुढे टाकायचं आहे. तुळजाभवानी अर्बनच्या विविध ठेव योजनांमुळे ही बचत सुरक्षित, नियोजित आणि फायदेशीर ठरते. आजच तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करा आणि थोड्या थोड्या साठवणुकीतून मोठा आधार उभा करा.
Your email address will not be published. Required fields are marked *